Wed, May 12, 2021 01:55
'बंदिश बँडिट्स' फेम अभिनेते अमित मिस्‍त्री यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन

Last Updated: Apr 23 2021 1:00PM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  

प्रसिध्द अभिनेते अमित मिस्‍त्री यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते वेब शो 'बंदिश बँडिट्स'मध्ये दिसले होते. अमित मिस्‍त्री यांना शुक्रवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे मॅनेजर महिर्षी देसाईने या वृत्ताची पुष्‍ट‍ी केली आहे. 'तेनाली रामा', 'मॅडम सर' आणि वेब शो 'बंदिश बँडिट्स'मध्ये अमित मिस्‍त्री यांनी काम केलं होतं. 

महिर्षी देसाई म्हणाले की, 'मी स्वत: धक्क्यात आहे आणि दु:खात आहे. ते ठिक होते आणि आपल्या घरीचं होते. त्यांना आरोग्याच्या तक्रारीही नव्हत्या. सकाळी त्यांच्या छातीत दुखू लागलं. हे सर्व अचानक घडलं की, कटुंबातील लोक त्यांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकले नाही.'