Mon, Aug 03, 2020 14:37होमपेज › Soneri › जेव्हा गंगूबाईला नवऱ्याने ५०० रू. साठी कोठ्यावर विकलं...

जेव्हा गंगूबाईला ५०० रू. साठी कोठ्यावर विकलं...

Last Updated: Jan 15 2020 11:09AM

आलिया भट्ट कोण आहे गंगूबाई काठियावाडी? जिच्यावर येतोय चित्रपट

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी चर्चेत आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात मुख्य भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे. याआधी आलिया भट्ट सलमान खानचा चित्रपट इंशाअल्लाहमध्ये प्रमुख भूमिकेत होती. परंतु, काही कारणास्तव सलमानने इंशाअल्लाहसाठी ब्रेक घेतला. परंतु, आलियाला भन्साळींचा गंगूबाई कठियावाडी चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा पहिला लूक १५ जानेवारीला रिलीज झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का, गंगूबाई कठियावाडी कोण आहे?

गंगूबाई काठियावाडी चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली आहे. चित्रपटामध्ये आलिया भट्ट, गंगूबाई कठियावाडीची भूमिका साकारणार आहे, जी एक वारांगना होती. हा चित्रपट यावर्षी ११ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गडा यांची आहे.

कोण आहे गंगूबाई कठियावाडी

गंगूबाई मुंबईमध्ये हीरामंडी नावाच्या भागात कोठा चालवत असे. त्याचबरोबर देशभरात वेगवेगळ्या शहरात फ्रेंचायजी कोठे चालवणारी ही देशातील पहिली पेशेवर महिला होती. साठच्या दशकात गंगूबाईचा असा दबदबा होती की, कोणीही तिच्या वाट्याला जात नसे. 

गंगूबाईचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असं होतं. ती गुजरातमधील काठियावाड येथील होती. गंगा, गुजरातमधील एका चांगल्या घरातील होती. तिला मुंबईला येऊन हिरोईन व्हायचे होते. वयाच्या १६ वर्षी ती आपल्या वडिलांच्या अकाउंटंटच्या प्रेमात पडते आणि मुंबई येऊन त्याच्याशी लग्न करते. 

Image result for alia bhatt hd

काही दिवसांनंतर, तिचा पती गंगाला ५०० रुपयांसाठी  कोठ्यावर विकतो. यानंतर, गंगाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. ती गंगा ते कोठेवाली गंगूबाई बनली. पुढे जाऊन मुंबई माफिया आणि नेत्यांसोबत तिची ओळख झाली होती. ती नेहमी सेक्स वर्कसच्या अधिकार, हक्कासाठी आवाज उठवायची. 

या चित्रपटाची कहाणी एस हुसैन जैदी यांचे पुस्तक माफिया क्वीन्स ऑफ मुंबई मधील एका भागावर आधारीत आहे. याआधी चित्रपटाचे नाव हीरामंडी असे ठेवले जाणार होते. आता गंगूबाई कठियावाडी असे नाव फायनल करण्यात आले आहे. चित्रपटाची स्क्रीप्ट तयार झाली आहे. यातील सर्व  गाणी रेकॉर्ड केली आहेत. सेट्सही तयार होत आहेत. 

आलियाची इच्छा झाली पूर्ण

आलिया भट्टने मामी चित्रपट महोत्सवात ही इच्छा व्यक्त केली होती की, तिला पद्मावतसारखी भूमिका करायची होती. कलंकमध्ये ही इच्छा पूर्ण होईल, असे म्हटले जात होते. परंतु, हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता अशी अपेक्षा आहे की, भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडीमधून माझी इच्छा पूर्ण होईल.

'या' अभिनेत्रींना मिळाली होती ऑफर 

Related image

खूप कमी लोकांना माहिती आहे की, भन्साळींनी गंगूबाईसाठी राणी मुखर्जीला ऑफर दिली होती. भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडीची स्क्रिप्ट सर्वात पहिल्यांदा राणीला ऐकवली होती. परंतु, काही कारणाने राणीला हा चित्रपट करता आला नाही. पुढे भन्साळी यांनी ही ऑफर प्रियांका चोप्राला दिली.

Related image

प्रियांकाला ही स्क्रिप्ट आवडली होती. परंतु, ती अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. त्यामुळे अखेर गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आलिया भट्टच्या झोळीत पडला.