Thu, Aug 13, 2020 17:12होमपेज › Soneri › अजय देवगन आणतोय गलवान खोऱ्यातील संघर्षावर सिनेमा 

अजयचा गलवान खोऱ्यातील संघर्षावर सिनेमा 

Last Updated: Jul 04 2020 2:00PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. आता यावर बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने सिनेमा आणण्याची घोषणा केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, "हे ऑफिशियल आहे की, अजय देवगन गलवान खोऱ्यातील घटनेवर चित्रपट आणणार आहे. अद्याप चित्रपटाला कुठलेही शीर्षक दिले गेलेले नाही. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या २० शूरवीर जवानांची कहाणी दाखवण्यात येईल, ज्यांनी चिनी सैन्यांना सडतोड उत्तर दिले. 

हा चित्रपट अजय देवगन आणि सेलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी प्रोड्यूस करणार आहेत. चित्रपटात कोण कोण कलाकार असणार, हे अद्याप फायनल झालेले नाही.

या चित्रपटात अजय देवगन अभिनय करणार की नाही, हे अद्याप समजलेले नाही. १५ जूनला पूर्व लडाखमध्ये गलवान घाटीत चिनी सैन्यासोबत हिंसक झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. पंतप्रधान मोदीदेखील काल दि. ३ रोजी सकाळी लडाख-लेहचा दौरा केला. जवानांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि सीमेवर तैनात जवानांची भेट घेण्यासाठी मोदी येथे पोहोचले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षावर आधारित चित्रपटाच्या घोषणेनंतर अजयच्या चाहत्यांनाही आनंद आहे. आता अजय लवकरच 'भुज: द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रीमियर केला जाईल. 

अजयच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर 

Image

अजयचा चित्रपट 'मैदान' १३ ऑगस्ट, २०२१ रोजी रिलीज होणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित चित्रपटात अजय प्रसिध्द फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे. हा एक बायोपिक आहे.