होमपेज › Soneri › तब्बूसोबत रोमान्स करताना दिसला ईशान 

तब्बूसोबत रोमान्स करताना दिसला ईशान 

Last Updated: Dec 03 2019 3:44PM

 'ए सूटेबल बॉय' मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मीरा नायरची सीरीज 'ए सूटेबल बॉय'चा पहिला लूक रिलीज झाला आहे. ईशान खट्टर आणि तब्बू स्टारर या वेब सीरीजचा पहिला लूक ईशानने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ईशान आपल्या वयापेक्षा मोठी असणारी अभिनेत्री तब्बूशी रोमान्स करताना दिसणार आहे. या फोटोमध्ये दोघे एका झोपाळ्यावर रोमँटिक मूडमध्ये बसलेले दिसत आहेत.  

हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवर आयुष्मान खुराना, करण जोहर आणि मीरा राजपूतसह अनेक सेलिब्रिटींनी कॉमेंट केले आहेत. 

या सीरीजमध्ये ईशान 'मान कपूर'ची भूमिका साकारत आहे. राम कपूर यांचीही मुख्य भूमिका आहे. 'मान कपूर'ला ज्या मुलीवर प्रेम होते, ती वारांगना 'सईदा बाई' आहे. 'सईदा'ची भूमिका तब्बू साकारत आहे. 'ए सूटेबल ब्वॉय' विक्रम सेठ यांच्या कादंबरीवर आधारित आहे. सहा भाग असणाऱ्या सीरीजला लुकआउट प्वांइट प्रोड्यूस करणार आहे. 

वेब सीरीजमध्ये ईशान, तब्बू आणि रामशिवाय रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिज्वी आणि माहिरा कक्कड यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाहदेखील या चित्रपटात दिसणार आहे. 

View this post on Instagram

A Suitable Boy.. first look

A post shared by Ishaan (@ishaankhatter) on