Thu, Sep 24, 2020 16:05होमपेज › Solapur › सोलापूर : कर्जबाजारीपणातून युवकाची आत्महत्या

सोलापूर : कर्जबाजारीपणातून युवकाची आत्महत्या

Published On: Dec 31 2017 1:34PM | Last Updated: Dec 31 2017 1:33PM

बुकमार्क करा
शेळवे : प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे कर्जबाजारीपणामुळे ४० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. 

नंदकुमार भागवत गाजरे असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यता आली आहे. 

यामधील मृत नंदकुमार हा शनिवारी सायंकाळी घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. म्हणून त्‍यांच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. यावेळी घराजवळ असणार्‍या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्‍महत्‍या केली असल्याचे उघड झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.