Fri, Dec 04, 2020 04:40होमपेज › Solapur › यशनगरात घरफोडी 

यशनगरात घरफोडी 

Published On: Dec 10 2017 1:22AM | Last Updated: Dec 09 2017 10:52PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

अरविंद धाम पोलिस वसाहतीशेजारी असलेल्या यशनगर भागात चोरट्यांनी घरफोडी करून 17 तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घरफोडीची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत युवराज उत्तम मोरे (वय 30, रा. 120/142, यशनगर भाग 1, खमितकर अपार्टमेंटच्या मागे, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज मोरे हे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बाळे कार्यालयात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी मोरे हे  कुटुंबासह त्यांच्या गावी मोहोळला शुक्रवारी रात्रीच गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी मोरे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून हॉलमधील लोखंडी कपाट उचकटून त्यातील ड्रॉव्हरमधील सोन्याचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेला. शनिवारी सकाळी मोरे यांच्या शेजार्‍यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, सहायक  पोलिस आयुक्त संजय भांबुरे, पोलिस निरीक्षक संजय जगताप, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी पाहणी केली.