Sun, Aug 09, 2020 10:28होमपेज › Solapur › सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर :  प्रतिनिधी

जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली.

जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षणाधिकार्‍यांना मनमानी कारभाराचा पाढाच वाचून दाखवला. तसेच त्यांना वेळीच आवर घालावा अन्यथा त्यांच्या कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना असल्याने याविषयाचा सविस्तर अहवाल उपसंचालकांना तत्काळ पाठवून देण्याच्या सूचना जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी केल्या. 

जिल्हा परिषदेच्या शाळांना आता घरगुती वीज बिलाप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 800 प्राथमिक शाळांना याचा लाभ होणार आहे. पूर्वी या शाळांना कमर्शियल पध्दतीने बिले आकारली जात होती. मात्र वीज वितरण कंपनीशी बोलणे झाले असून त्यांनी अकारणी आता घरगुती दराप्रमाणे बिल आकारण्याचे मान्य केले असल्याचे संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या इमारतीवर सौर पॅनल उभारुन वीजनिर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा परिषद इमारतीची लवकरच पाहणी करण्यात येणार आहे. याठिकाणी निर्मिती होणारी वीज वीज वितरण विभागाला देण्यात येणार असल्याची माहितीही संजय शिंदे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे निधीची उपलब्धता असून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रस्ताव पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 27 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरीही देण्यात आली असल्याचे संजय शिंदे यांनी यावेळी सांगितले.