Wed, Feb 19, 2020 09:23होमपेज › Solapur › अमेरिकेतही युतीची सत्ता येईल : दिलीप माने

सोलापूर : 'अमेरिकेतही युतीची सत्ता येईल'

Last Updated: Oct 09 2019 8:13PM

युतीचे उमेदवार दिलीप मानेसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरमध्यचे युतीचे उमेदवार दिलीप माने यांनी आज (ता.९) सकाळी मतदारसंघात पदयात्रा काढली. यावेळी महापालिकेत, जिल्हा परिषदेत, राज्यात, देशात युतीची सत्ता आहे, आता यापुढे अमेरिकेतही युतीची सत्ता येईल, असे म्हणाले. सोलापूर शहर मध्यची लढत ही जिल्ह्यातच लक्षवेधी ठरली आहे. या मतदारसंघात ६ तगडे उमेदवार असल्याने सर्वांच्या नजरा याकडे लागले आहेत. सर्वच उमेदवार मतदारसंघात जोरदार प्रचार करत असून, यावेळी माने यांनी सकाळी पदयात्रेपासून सुरुवात केली. 

यावेळी त्यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना म्हणाले, गेल्या दहा वर्षात आम्ही हेच ऐकत आहोत, आमची सत्ता नाही, आम्ही हे करू ते करू, ते काहीही केले नाही, शिवसेनेसारखा तसेच भाजपसारखे चांगल्या पक्षाची गरज असल्याचे लोकांची मागणी आहे, भाजप-शिवसेना युतीची सत्ता महापालिकेत, राज्यात, देशात आहे, आता अमेरिकेतही युतीचेच सरकार येईल, असे दिलीप माने यांनी म्हणाले.