Fri, Sep 25, 2020 11:54होमपेज › Solapur › सोरेगावच्या कॅनॉलमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला

सोरेगावच्या कॅनॉलमध्ये तरुणाचा मृतदेह सापडला

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:05PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

 तरुणाचा मृतदेह सोरेगाव येथील कॅनॉलमध्ये तरंगताना आढळला असल्याची नोंद विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. राहुल अनिल काटकर (वय 30, रा. सोरेगाव, ता.द. सोलापूर) याचा मृतदेह सोरेगाव येथील कॅनॉलमध्ये रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास तरंगताना आढळून आला. याची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक एस.व्ही.लोहार यांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहास शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.

पैशाच्या कारणावरून मारहाण

पैशाच्या कारणावरून मारहाण करण्यात आल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत योगीराज रेवणसिध्द राठोड (वय 34, रा. फताटेवाडी, द. सोलापूर) यांनी नोंद केली आहे. रविवारी भोगाव (उत्तर सोलापूर) येथील आश्रमशाळेजवळ पैशांच्या कारणावरून संजय राठोड, वैभव राठोड व इतर एक यांनी लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याने जखमी झाले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे.

पैगंबर जयंती उत्सवातील कार्यक्रमामध्ये तरुणास मारहाण

पैंगबर जयंती उत्सवामध्ये तीन तरुणांना मारहाण झाल्याने जखमी  तिघेे तरुण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.दाऊज रजाक शेख (वय 30, रा. साईनाथ नगर, नई जिंदगी, सोलापूर) व मोहसीन मुस्तफा कल्याणी (वय 27, रा. शिवगंगा नगर, नई जिंदगी, सोलापूर), जावीद मुस्तफा कल्याणी (वय 30, रा. शिवगंगा नगर, नई जिंदगी, सोलापूर) या तिघांस पैगंबर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमामध्ये अज्ञात कारणावरुन हारुन सय्यद व इतर 20 जणांनी काठीने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. या तिघा जखमींना मौलाली शेख गफूर कल्याणी यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

जनार्धन सूर्यभान राजेगावकर(वय 50, दहिटणे, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी स्वत:च्या शेतात रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तुरीवर फवारणीचे औषध पिल्याने अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दिगंबर राजेगावकर यांनी दाखल केले आहे.

दुचाकीवरून पडून महिला जखमी

निमा अर्जुन शेळके (वय 50, रा. यावली, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकी वाहनावरून पडून जखमी झाल्या आहेत. राहत्या घरापासून ते शिरापूर येथे जात असताना लांबोटीजवळ दुचाकीचे चाक खड्ड्यात जाऊन महिला व त्यांचा मुलगा किसन हे दोघे पडले. या अपघातामध्ये महिलेच्या डोक्यास जबर मार लागला आहे. 
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास किसन शेळके यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.