Sat, Jul 11, 2020 09:21होमपेज › Solapur › सोलापूर ग्रामीण भागात 17 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह

सोलापूर ग्रामीण भागात 17 जणांचे अहवाल आले पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 02 2020 8:01AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा संसर्ग वाढत असून मंगळवारी नव्याने आणखी 17  रुग्ण वाढले आहेत. यामध्ये 14 पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे, तर 12 जण कोरोनामुक्‍त होऊन घरी परतले आहेत. यामध्ये आठ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहेे.

मंगळवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये बाणेगाव, तालुका उत्तर सोलापूरमधील 1 पुरुष, तिर्‍हे, ता. उत्तर सोलापूरमधील 2 पुरुष, मार्डी, तालुका उत्तर सोलापूर एक पुरुष, गाताडे प्लॉट, पंढरपूर 1 पुरुष, 
भक्‍त निवास, पंढरपूर 1 पुरुष, रुक्मिणीनगर पंढरपूर एक पुरुष, घोडके गल्ली, पंढरपूर 1 पुरुष, औदुंबर पाटील नगर पंढरपूर एक पुरुष, नवी पेठ पंढरपूर एक पुरुष, जुनी पेठ पंढरपूर एक पुरुष, मोहोळमधील क्रांतीनगर भागातील एक पुरुष, मेहबूब नगर, एक महिला, नागनाथ गल्ली, एक महिला, तर जेऊरवाडी, तालुका अक्कलकोट येथील एक पुरुष आणि बोरगाव (दे), तालुका अक्कलकोट येथील एका पुरुषाचा समावेश आहे. 

आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची  संख्या 361 इतकी झाली आहे. आजपर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 202 आहे. आजपर्यंत रुग्णालयातून बरी होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 142 आहे. 

सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात दोन महिने उशिराने रूग्ण आढळून येण्यास सुरूवात झाली आहे. पंढरपूर शहरातही जून महिन्यातच पहिला कोरोनाबाधित आढळून आला. त्यानंतर मात्र मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, बार्शी या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाविषयक जनजागृती नसल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनासह स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गोदुताई परूळेकर नगरमधील कोरोनाची साखळी तोडण्याचे यशस्वी काम केले आहे. परंतु आता इतर तालुक्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे.