उस्मानाबाद : प्रतिनिधी
प्रशिक्षणासाठी दुचाकीवरुन निघालेल्रा शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या तरुण प्रांताधिकार्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. तुळजापूर रस्त्यावर पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.
डॉ. चंद्रकांत तुकाराम भाळे (वर २८, रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे मृत प्रांताधिकार्याचे नाव आहे. डॉ. भाळे हे शेळी व मेंढी विकास महामंडळात प्रांताधिकारी होते. मंगळवारी पहाटे तुळजापूरच्या दिशेने उस्मानाबाद शहराकडे ते दुचाकीवरुन (एमएच ४५ एजी ०११९) जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत देवीदास नारारण वाघमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार शेख तपास करीत आहेत.