होमपेज › Solapur › गुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील

गुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पान शॉपमध्ये गुटखा सापडल्यास अन्न औषध प्रशानाकडून पान शॉप सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी पार्क चौकातील श्री दत्त पान शॉपमध्ये गुटखा सापडल्याने हे पान शॉप अन्न औषध प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्री करणार्‍यांविरोधात कठोर कारवाईची करण्याची मोहीम सुरू केली आहे. बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने पार्क चौकातील दत्त पान शॉपवर धाड टाकली. या धाडीत या दुकात गुटखा व पानमसाला व सुगंधीत सुपारी या प्रतिबंधित पदार्थांची विक्री होत असल्याने माल जप्त करण्यात आला. या पान शॉपवर यापूर्वीच अशाच प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता. शॉपने अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत अन्न परवाना/नोंदणी घेतलेली नव्हती तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या पुरवठादारांबाबत वारंवार विचारणा करूनही व्यवस्थित माहिती दिली नाही. त्यामुळे वारंवार कायद्याचे उल्लघंन करणार्‍या या प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून दत्त पान शॉपवर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एन.टी. मुजावर, व्ही.एस. लोंढे यांनी केली व अशाप्रकारची कारवाई यापुढे संपूर्ण जिल्ह्यात राबविणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.