Thu, Sep 24, 2020 17:15होमपेज › Solapur › सोलापूर : टाकीत बुडून बालकाचा मृत्यू

सोलापूर : टाकीत बुडून बालकाचा मृत्यू

Published On: Dec 31 2017 3:52PM | Last Updated: Dec 31 2017 3:52PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

 सोलापुर शहरातील तुळजापूर रोडवरील दत्तात्रय विजय साळुंखे (वय 3 वर्ष) या बालकाचा घरातील सिंटेक्स टाकीत बुडून मृत्यू  झाला. ही घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली.
शुक्रवार पासून हा मुलगा राहत्या घरातून गायब झाला होता. गल्लीमध्ये व नातेवाईकांकडे शोधाशोध केल्यानंतर वडील विजय साळुंखे यांनी जोडभावी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती.

आज, रविवारी सकाळी विजय साळुंखे हे अंघोळीसाठी गेले असताना त्यांचे लक्ष 1000 लिटर च्या पाण्याच्या टाकीकडे गेले. या पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे पडले होते. त्यांना संशयास्पद वाटल्याने विजय साळुंखे यांनी सिंटेक्स टाकीवर चढून डोकावून पाहिले असता, दत्तात्रय या बालकाचा मृतदेह टाकीमध्ये तरंगताना आढळला. त्यांनी ताबडतोब टाकीत उतरून मृतदेह बाहेर काढला. पोलीसांना ताबडतोब या घटनेची माहिती दिली.

लहान मुलाच्या आईने मुलाचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला. एवढ्या चिमुकल्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने तुळजापूर नाका परिसरात शोककळा पसरली आहे. विजय साळुंखे हे बांधकाम मिस्त्री म्‍हणून काम करतात तर मृत मुलाची आई गृहिणी आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, तपास सुरू आहे. एवढ्या उंचीवर असलेल्या टाकी पर्यंत हा तीन वर्षीचा बालक पोहोचला कसा याचा तपास पोलीस करत आहेत.