Thu, Sep 24, 2020 17:07होमपेज › Solapur › बार्शी येथे दोन गटांत  हाणामारी; 5 जखमी

बार्शी येथे दोन गटांत  हाणामारी; 5 जखमी

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:23PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी

भगवंत मैदानावर झालेल्या किरकोळ कारणावरून दोन गटांत दांडा, धारदार हत्यार व लोखंडी रॉडने झालेल्या भांडणात दोन्ही गटांतील पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवारी, सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास गवत गल्ली भागात घडली.

रोहित बाळू घोडके, ललित नागाशंकर वस्ताद, अश्रफ  अरिफ पठाण, सोहेल राजू खड्डेवारे व सोहेल मोहम्मद अली मणियार अशी दोन गटांत झालेल्या मारहाणीत जखमींची नावे आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील सोळाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोहित बाबू घोडके (वय 18, रा. चोरमले प्लॉट, बार्शी) यानी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भगवंत मैदानावर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून इरफान पठाण, शोएब मणियार, इम्या मणियार, रिझवान काझी व अन्य अनोळखी चार यांनी  दांड्याने व धारदार शस्त्राने डोक्यात व पाठीत मारहाण करून जखमी केले.

तर  अशरफ अरिफ पठाण (21 रा. मंगळवार पेठ, बार्शी)  यांनी  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भगवंत मैदानावर झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून सागर पवार, विनोद मोरे, आनंद पवार, अमोल पवार, विकी मोरे, बबन नायकोजी, महेश पवार व आकाश पवार यांनी लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने तोंडावर, पाठीस व डोक्यास मारून जखमी केले. जखमींवर बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  परस्परविरोधी फिर्यादीवरून दोन्ही गटांतील 16 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड व जाधव करत आहेत.