Sat, Sep 19, 2020 11:36होमपेज › Solapur › जि.प.विरोधी पक्षनेता पदाचा दावा काँग्रेसने मागे घेतला

जि.प.विरोधी पक्षनेता पदाचा दावा काँग्रेसने मागे घेतला

Last Updated: Sep 17 2020 2:15AM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता या पदावर काँग्रेसच्या सदस्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली होती. मात्र, हा दावा बुधवारी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान विरोधी पक्षनेते बळीरामकाका साठे यांचे पद अबाधित राहिले आहे. 

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने यांना चेअरमन करण्यात साठे यांनी मदत केली. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी जि.प.विरोधी पक्षनेता या पदावर काँग्रेसच्या सदस्याची निवड करण्यात यावी, अशी मागणी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे केली होती. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेऊनच काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 "