Mon, Aug 03, 2020 14:54होमपेज › Solapur › खा. शरद बनसोडे यांच्या कार्यालयाच्या बोर्डला फासले काळे 

खा. शरद बनसोडे यांच्या कार्यालयाच्या बोर्डला फासले काळे 

Published On: Jul 26 2018 2:39PM | Last Updated: Jul 26 2018 2:39PMमोहोळ : वार्ताहर 

मोहोळ येथील खासदार अॅड. शरद बनसोडे यांच्या संपर्क कार्यालयाच्या बोर्डवरील खा. बनसोडे यांच्या नावाच्या बोर्डला काळे फासल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार कोणी केला याबाबतची माहीती उपलब्ध झाली नाही. 

याबाबत अधिक माहीती अशी की, मंगळवारी रात्री मोहोळ येथील नगरपरिषद कार्यालयाजवळ व पंचायत समिती आवारा समोर शरद बनसोडे यांचे संपर्क कार्यालय आहे. तेथे त्यांच्या फोटोसह कार्यालयाच्या पत्त्याचा डिजीटल फ्लेक्स लावण्यात आले आहे. त्या बोर्डावरवील प्रतिमेला व मजकुराला काळे  फासण्यात आले. सकाळी ही गोष्ट लक्षात आली त्‍यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान राखत तणाव टाळण्यासाठी समजुतदारपणाची भुमिका घेत हा बोर्ड उलटा करून ठेवला.