Wed, Sep 23, 2020 07:38होमपेज › Solapur › टेम्पोचे चाक निखळून 13 जखमी

टेम्पोचे चाक निखळून 13 जखमी

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 9:17PM

बुकमार्क करा
 बार्शी : तालुका प्रतिनिधी 

कामगारांना   घेऊन जाणार्‍या टेम्पोचे   पुढचे  टायर निखळून  पडल्यामुळे झालेल्या अपघातात 13 कामगार जखमी झाल्याची घटना रविवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बाभुळगाव ते भोयरेदरम्यान (ता. बार्शी) असलेल्या सोन्याच्या माळाजवळ घडली. 

सुमन प्रभाकर माने (वय 55), संगीता दत्तात्रय शिंदे (45), राजेंद्र बाबुराव शिंदे (39), अश्‍विनी कुंदन गांधले (25), शिल्पा मच्छिंद्र शिंदे (35), लता सुनील ढावारे (40), सारिका तानाजी मोरे (30), उषा राजेंद्र शिंदे (35), पूनम दिनकर शिंदे ( 25), पद्मिनी दिलीप शिंदे (30), दिलीप नाना शिंदे (47), रोहिणी भालचंद्र अडसूळ (38) व प्रभाकर गुरूबा माने ( 59, सर्व रा. बाभुळगाव, ता. बार्शी) अशी अपघातात जखमी झालेल्या कामगारांची नावे असून जखमींना  बार्शी येथील वेगवेगळ्या  खासगी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

बाभुळगाव येथील महिला व पुरूष कामगार आयशर टेम्पोमधून बार्शी येथील एका रस्सीनिर्मिती कारखान्यात  कामासाठी जात होते. दरम्यान, नादुरूस्त रस्त्यामुळे टेम्पो सोन्या माळाच्यादरम्यान आला असता टेम्पोची पुढील दोन्ही चाके टायरसह निघून  पडली. त्यामुळे  टेम्पो चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन रोडच्या कडेला जाऊन पलटी झाला. परिसरातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना टेम्पोबाहेर काढून बार्शी येथे उपचारासाठी हलवले. अपघातस्थळी कामगार महिलांचे जेवणाचे डबे व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.