Fri, May 07, 2021 17:53होमपेज › Solapur › पंढरपूर : विठ्ठलाचे मुख दर्शन तीन दिवस बंद

पंढरपूर : विठ्ठलाचे मुख दर्शन तीन दिवस बंद

Last Updated: Nov 22 2020 8:54PM
पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

कार्तिकी यात्रा सोहळा साजरा होत असताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. सध्या भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुख दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कार्तिकी यात्रा सोहळ्यात (दि. २५ ते २७) दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुख दर्शन व्यवस्था बंद करण्यात येणार आहे. याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

सोलापूर : लोकनेते साखर कारखान्यात बायोडायजेस्टर गॅसटाकी पडून २ कामगारांचा मृत्यू

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा दि. २६ रोजी साजरा होत आहे. मात्र हा सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभुमिवर आषाढी प्रमाणे प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येत आहे.  असे असले तरी अनेक भाविक यात्रेच्या अगोदरच श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरीत दाखल झालेले आहेत. तर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्या शासनाने भाविकांना मंदिर दर्शनाकरीता खूले केले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल मंदिरात दोन हजार भाविकांना ऑनलाईन बुकींग केल्यानंतर सोडण्यात येत आहे. त्यामुळे अनेक भाविकांना सात ते आठ महिन्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणीचे मुख दर्शन घेत धन्यता मानली आहे. तर लाखो भाविक नामदेव पायरी येथूनच नतमस्तक होत आहेत.

मालवाहतूक कंटेनरची केमिकल टँकरला धडक

कार्तिकी यात्रेसाठी शहरात भाविकांची वाढणारी गर्दी लक्षात घेवून प्रशासनाच्यावतीने संचारबंदी करण्यात येणार आहे. ही संचारबंदी दि. २४ नोव्हेबरच्या रात्री १२ वाजेपासून ते २६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यत पंढरपूर शहर व शहरालगतच्या ११ गावांमध्ये लागू असेल. यामुळे भाविकांची वाढणारी गर्दी कमी होणार आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये. भाविक मुख दर्शनानिमित्त मंदिरात येवू नयेत म्हणून कार्तिकी दशमी, एकादशी व व्दादशी असे तीन दिवस मुख दर्शन व्यवस्था बंद करण्यात येणार आहे. या तीन दिवसात भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे ऑनलाईन बुकींग केलेल्या भाविकांना मुख दर्शनाकरीता वाट पहावी लागणार आहे. मात्र दि. २८ पासून पुढील ऑनलाईन मुख दर्शन पासचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीकडून सांगण्यात आले