होमपेज › Solapur › अक्षता सोहळ्याला राजकीय मांदियाळी

अक्षता सोहळ्याला राजकीय मांदियाळी

Last Updated: Jan 15 2020 1:47AM
सोलापूर : प्रतिनिधी

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भक्तदेखील मोठ्या संख्येने उपस्थित असतात, तसेच सर्वच राजकीय पक्षांतील नेते, पदाधिकारीदेखील मोठ्या संख्येने दरवर्षीच उपस्थित राहतात. यंदादेखील महापौरांसह बड्या राजकीय नेत्यांची मांदियाळी अक्षता सोहळ्यात दिसून आली. जिल्हा परिषद सभापती निवडीच्या राजकीय खलबतांमधून वेळ काढून नेत्यांनी अक्षता सोहळ्यास उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यास उपस्थित राहिल्यानंतर काही ना काही तरी गोड फळ मिळतच असल्याचा अनुभव अनेक राजकीय दिग्गजांनी घेतलेला आहे.  काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीदेखील सहपरिवार अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावली होती. मंगळवारी श्री सिद्धेेश्वर मंदिरातील संमती कट्टा येथे पार पडलेल्या अक्षता सोहळ्यास प्रतिवर्षाप्रमाणे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वला शिंदे, आ. प्रणिती शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. प्रशांत परिचारक, आ. राजेंद्र राऊत, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, प्रताप चव्हाण, माजी महापौर मनोहर सपाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, महादेव चाकोते, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, नरसिंग मेंगजी, शिवशरण पाटील, अ‍ॅड. मिलिंद थोबडे, केदार उंबरजे, नगरसेवक चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, वैभव हत्तुरे, संजय कोळी, नागेश वल्याळ, शिवानंद पाटील, जगदीश पाटील, सुदीप चाकोते, रमेश यन्नम, राजू सुपाते आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या दिग्गजांची मात्र अनुपस्थिती जाणवली.

प्रशासकीय अधिकार्‍यांची सहपरिवार उपस्थिती

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अंकुश मोरे आदी सहपरिवार उपस्थित होते. तर महापालिका आयुक्त दीपक तावरे मुंबईतील बैठकीसाठी गेल्याने त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित होत्या. अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र टॉवरवर आसन व्यवस्था होती.