मकर संक्रात : श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिरात सुंदर फुलांची मनमोहक आरास

Last Updated: Jan 14 2021 9:58AM
पंढरपूर : पुढारी वृत्‍तसेवा

श्री विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने आज (गुरूवार) मकर संक्रांतीच्या निमित्‍ताने श्री विठ्ठल आणि रूक्‍मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात रंगीबेरंगी फुलांची सुंदर व मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे. समितीकडून विविध सणांच्या प्रसंगी अशा पध्दतीने फुलांची आरास केली जाते.

अधिक वाचा : बर्ड फ्लूमुळे खवय्यांचा मोर्चा मटणाकडे! मात्र दर... 

श्री विठ्ठल रूक्‍मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिर मकर संक्राती सणानिमित्‍त आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. लाल, गुलाबी, पिवळी, पांढरी आणि जांभळ्या रंगातील फुलांच्या सजावटीने मंदिराचा गाभारा आणि मंदिर नटलेलं आहे. या सोबतच श्री विठ्ठल आणि रूक्‍मिणीमातेची विशेष पूजा बांधण्यात आली आहे. तसेच मंदिर आवारात रेखाटलेल्‍या आकर्षक रांगोळ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.