Tue, Aug 04, 2020 14:11होमपेज › Solapur › सोलापूर : माढा तालुक्यात आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह

सोलापूर : माढा तालुक्यात आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 15 2020 12:13PM

संग्रहित छायाचित्रमाढा (सोलापूर) : पुढारी वृत्तसेवा

माढा तालुक्यात आज सकाळी सात जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील सात पैकी पाच जण आधीच्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील आहेत. तर कुर्डूवाडी शहरातील नव्याने दोन जणांची भर पडली. सध्या तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ३४ वर पोहोचली आहे. यात आतापर्यत दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

माढा तालुक्यातील सर्वात मोठे शहर आणि रेल्वे जंक्शन असलेल्या कुर्डूवाडी शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज रिधोरे ४, कुर्डूवाडी २ आणि भोसरे येथील एक जण असा सात रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर यातील तालुक्यातील एकाचा अहवाल प्रतीक्षेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पलंगे यांनी सांगितले आहे.