Wed, May 12, 2021 01:04होमपेज › Solapur › कार्तिकी यात्रा : संचारबंदीतही पंढरपूरची बससेवा राहणार सुरु

कार्तिकी यात्रा : संचारबंदीतही पंढरपूरची बससेवा राहणार सुरु

Last Updated: Nov 22 2020 9:05PM

संग्रहित फोटोपंढरपूर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक पध्दतीने साजरी करण्यात येत आहे. भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दोन दिवस संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने बससेवा देखील बंद करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेवून प्रशासनाने नागरिकांच्या सेवेकरीता दि. २५ व २६ रोजी बस सेवा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या बसमध्ये भाविकांना प्रवेश करता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.

पंढरपूर : विठ्ठलाचे मुख दर्शन तीन दिवस बंद

सद्या कोरोनाचे सावट जास्त गडद होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने यंदाची कार्तिकी यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी यात्रेप्रमाणे प्रतिकात्मक कार्तिकी यात्रा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पालख्या, दिंड्या यांना पंढरपूर तालूक्यात प्रवेश नाकारला आहे. त्याचबरोबर ज्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाने तेथील जिल्ह्यातील तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना आदी राज्यातून पालख्या, दिंड्या अथवा भाविक पंढरपूरकडे येणार नाहीत याबाबत दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. याची कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

याचअनुषंगाने पंढरपूर शहरात भाविकांनी गर्दी करु नये. गर्दी केली तर कोरोनाचा फैलाव, प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याने कार्तिकी यात्रा प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार आहे. याकरीता शहरात भाविक येवू नयेत म्हणून दोन दिवस संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर दि. २२ पासून पंढरपूरकडे व पंढरपूरहून होणारी बस सेवा देखील बंद करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने यात बदल करून प्रवाशांकरीता बस सेवा पुर्ववत सुरू ठेवली आहे.

मालवाहतूक कंटेनरची केमिकल टँकरला धडक

यात्रा कालावधीत बस सेवा बंद करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना बाहेर ये जा करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. तसेच नागरिकांना वेठीस धरले जात असल्याची भावना जनमाणसात निर्माण होत आहे. नागरिकांच्या वाढणारा रोष जिल्हा प्रशासनाच्या लक्षात येताच  दि. २५ ते २६ नोव्हेंबर रोजी बस सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र या बसमधून भाविकांना पंढरपूर येथे उतरता येणार नाही. शक्यतो भाविकांनी बसने प्रवास करणे टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. 

दरम्यान पंढरपूरकडे होणारी इतर खाजगी वाहतूक देखील दि. २२ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान जड वाहतूक व दिंडी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. इतर पर्यायी मार्गाने अवजड वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा कालावधीत नेहमी बंद राहणारी बस वाहतूक या वेळेस मात्र सुरु राहणार असल्याने प्रवाशशंमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

जिल्ह्यात दिवसभरात 181 जण कोरोनामुक्‍त

प्रवाशी व भाविक ओळखण्यात होणार गफलत

कार्तिकी यात्रा एकदशीच्या मुख्य सोहळ्यादिवशी बस सेवा सुरु ठेवण्यात आली असल्याने प्रवाशांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. स्थानिक प्रवाशांनाच बसमधून ये जा करता येणार आहे. भाविकांना पंढरपूर येथे उतरण्याची परवानगी नाही. असे असले तरी  स्थानिक प्रवाशी व भाविक ओळखताना मात्र आगार व्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. प्रवासी आहे की भाविक आहे, हे सिद्ध करण्यासाठी ओळखपत्र जवळ बाळगावे लागणार आहे.

बस प्रवाशांसाठी नियमावली

* दि. २२ ते २६ बंद केलेली बस सेवा पुन्हा पुर्ववत सुरु
* दि. २५ व २६ रोजी भाविकांनी बस ने प्रवास करु नये. 
*केलाच तर भाविकांनी पंढरपूर येथे उतरु नये. याची खबरदारी घ्यावी
* त्रिसत्रीय नाकाबंदीत बसची होणार तपासणी
*अवजड व खाजगी वाहतूक बंद असणार आहे.