Fri, Sep 25, 2020 14:55होमपेज › Solapur › सायबर गुन्हेगारांची ‘मुंबई’ राजधानीच

सायबर गुन्हेगारांची ‘मुंबई’ राजधानीच

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:17PM

बुकमार्क करा

सोलापूर : श्रीकांत साबळे

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबई आता सायबर गुन्हेगारांची राजधानी म्हणून नावारूपाला येऊ लागली आहे. 2016 मध्ये सर्वाधिक सायबर क्राईमचे गुन्हे मुंबईत उघडकीस आले आहेत. तर बेंगलोर दुसरे आणि जयपूर हे सायबर गुन्हेगारांचे तिसरे टार्गेट आहे. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात एनसीआरबीचा 2016 चा समग्र अहवाल नुकताच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालात देशातील गुन्हेविश्‍वाची आकडेवारी देण्यात आली असून, जगभरात धुमाकूळ घालणार्‍या सायबर गुन्ह्यांची माहिती या अहवालात नमूद केली गेली आहे. 

गत दोन वर्षांत देशभरात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईमच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या अहवालातील आकडेवारीवर देशात 2014 ला 3 हजार 265 इतक्या सायबर गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्या तुलनेत 2016 चा विचार केला तर यावर्षी हा आकडा वाढून 4 हजार 172 वर पोहचला आहे. 2014 आणि 2016 च्या तुलनेत 2015 ला 4 हजार 4 हजार 561 इतके सायबर गुन्हे नोंद झाले होते. सरासरीचा विचार केला तर 2016 ला गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून येत आहे. परंतु देशातील महत्त्वाच्या शहरांच्या सायबर क्राईमचा विचार केला तर मुंबईतील गुन्ह्यांचे प्रमाण हे 23 टक्के असल्याचे दिसून येते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून प्रसिध्द असल्यामुळे याठिकाणी सायबर क्राईमला मोठा स्पेस आहे. त्यामुळेच याठिकाणी 2014 ला 608 गुन्हे दाखल होते, तर 2016 ला हा आकडा 960 वर पोहचला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीवर सायबर गुन्हेगारांचे लक्ष असल्याचे दिसून येते. मोठ्या शहरांमध्ये बेंगलोर आणि जयपूरचा सायबर गुन्ह्यात द्वितीय आणि तृतीय क्रमांक असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.