Tue, Oct 20, 2020 11:57होमपेज › Solapur › सोलापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आसूड आंदोलन  (video)

सोलापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आसूड आंदोलन (video)

Last Updated: Sep 21 2020 6:49PM

पार्क चौक येथे केंद्र आणि राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला चाबूकने मारण्यात आले.सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आसूड आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पार्क चौक येथे केंद्र आणि राज्य सरकारचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याला चाबूकने मारण्यात आले.

यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या. मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गनिमी कावा स्टाईलने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा समनव्यक राम जाधव, समनव्यक किरण पवार, अर्जुन सोनवणे, राहूल दहीहंडे, कुणाल मोरे, राहुल जाधव,सागर धावणे, श्रीकांत जाधव आदी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

वाचा : मराठा आरक्षणप्रश्‍नी आज सोलापूर बंदची हाक

 "