होमपेज › Solapur › 'ईव्हीएम'मध्ये घोळ : सुशीलकुमार शिंदे, सुजात आंबेडकरचा आरोप

'ईव्हीएम'मध्ये घोळ : सुशीलकुमार शिंदे, सुजात आंबेडकरचा आरोप

Published On: Apr 18 2019 3:05PM | Last Updated: Apr 18 2019 3:25PM
सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी नोंदवला आहे. परंतु, मतदान यंत्रामध्ये कसलाच घोटाळा नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगत, सर्व आरोप फेटाळले आहेत.

गुरूवारी सकाळी मतदान सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी  वेळेत मतदान सुरू होवू शकले नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनेदेखील कपबशीचे बटन दाबल्यास कमळाची लाईट पेटत असल्याचा आरोप केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला. तदान यंत्रामध्ये घोळ करण्यात आला आहे.  कपबशीचे बटण दाबले जात नाही आणि दाबले गेलेच तर मत कमळाला जात आहे, असा दावा सुजात आंबेडकर  केला आहे.

असाच आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला जात असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. तसेच  सुजात पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनीही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हटलं आहे. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

दरम्यान, १४९ व्हीव्हीपॅट मशीन बदलण्यात आले असून आक्षेप घेतलेली यंत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले.