सोलापूर : कोरोनामुळे आणखी ५ जणांचा मृत्यू

Last Updated: Jul 11 2020 1:26AM
Responsive image


सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सोलापूर शहरातील मृत्यूदर वाढत चालला असून, गुरुवारी आणखी 5 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर, नव्याने 84 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 73 जणांना बरे वाटल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. 

राज्यात सोलापूरचा मृत्यूदर सर्वात पुढे गेला असून, आजपर्यंत शहरातील 292 जण दगावले आहेत. तर, संक्रमितांची संख्या 3 हजार 26 इतकी झाली आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 1127 जणांवर उपचार सुरू असून आजपर्यंत 1607 जण बरे झाले आहेत.

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहरात रोजच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त संसर्ग होत असल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट होत आहे. 

गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कल्याण नगर, विद्यानगर, शेळगी, स्वामी विवेकानंद नगर, ओम नम:शिवाय नगर, होटगी रोड, चंदन नगर, जुळे सोलापूर, मुरारजी पेठ, लक्ष्मी नगर, होटगी रोड, मल्लिकार्जुन नगर, कुमठा नाका, त्रिमूर्ती नगर, मजरेवाडी, कोणार्क नगर, एन.जी. मिल चाळ, नामदेव नगर, भवानी पेठ, उत्तर कसबा, दत्त नगर, गोकुळ नगर, बॉईज हॉस्टेल, शास्त्री नगर, बुधवार पेठ, भद्रावती पेठ, शेळगी, विद्या नगर, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सुमंगल सोसायटी, वडार गल्ली, हराळे नगर, काडादी चाळ, दिलीप नगर, कुमठे गाव, कमला नगर, नेहरू नगर, दोन नंबर झोपडपट्टी, विजापूर नाका, लक्ष्मी नगर, अशोक चौक, फॉरेस्ट, भवानी पेठ, मोहम्मदिया मशिदीजवळ, रेल्वे लाईन, हत्तुरे वस्ती, शुक्रवार पेठ, मोहिते नगर, होटगी रोड, कोणार्क नगर, उजनी नगर, आशिया नगर, जुळे सोलापूर, गोकुळ नगर, जुळे सोलापूर, दाजी पेठ, मार्कंडेय रूग्णालय, विशाल नगर, जुळे सोलापूर, आशा नगर, मित्र नगर शेळगी, वेदांत नगर, अक्कलकोट रोड, इंद्रधनु विष्णुमिल कंपौंड, जवाहर सोसायटी, रविवार पेठ, विडी घरकुल, मोदीखाना, म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर, माजी सैनिक नगर, दक्षिण कसबा या परिसरातील रूग्णांचा समावेश आहे. 

गुरूवारी मृत पावलेल्या व्यक्तिमध्ये निराळे वस्ती येथील 80 वर्षीय पुरूष, व्ही. एम. सोसायटी येथील 76 वर्षीय पुरूष, अभिषेक नगर, पुणे नाका येथील 51 वर्षीय महिला, रेल्वे लाईन येथील 41 वर्षीय पुरूष तसेच काजल नगर येथील 65 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.