Wed, Jan 20, 2021 21:00होमपेज › Solapur › जिल्ह्यात दिवसभरात 181 जण कोरोनामुक्‍त

जिल्ह्यात दिवसभरात 181 जण कोरोनामुक्‍त

Last Updated: Nov 21 2020 10:42PM
सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापूर शहर व जिल्ह्यात शनिवारी 274 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकाच दिवसात 181 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात केवळ तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आणखी 407 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

शनिवारी सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 6010 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी   5769 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 241 जणांचे अहवाल कोेरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 133 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील केवळ 881 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी  848  जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 48 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

शनिवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मृत्यू पावलेल्यांमध्ये माळशिरस येथील 65 वर्षाचा पुरूष, पंढरपूर तालुक्यातील बोहाळी येथील 30 वर्षाचा  पुरूष, मंगळवेढा तालुक्यातील 62 वर्षाच्या पुरूषाचा मृत्यू झाला आहे.

आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील 34 हजार 32, तर शहरातील 10 हजार 108,  असे एकूण 44 हजार 140 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 1007, तर शहरातील 557, अशा एकूण 1564 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागापैकी 1 हजार 384, तर शहरातील 494, अशा एकूण 1 हजार 878 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 31 हजार 641, तर शहरातील 9 हजार 57, असे एकूण 40 हजार 698 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.