Wed, Jul 08, 2020 20:20होमपेज › Select Category › रात्री उशिरा झोपताय? मग बातमी वाचा!

रात्री उशिरा झोपताय? मग बातमी वाचा!

Last Updated: Oct 18 2019 7:18PM

संग्रहित छायाचित्रडॉ. संजय गायकवाड
 

हल्ली खूप व्यग्र दिनक्रमामुळे लोकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, तासन्तास लॅपटॉपवर बसून काम करणे आणि रात्री उशिरा जेवण करणे, नित्याचे झाले आहे. आपल्यापैकी अनेकजण आरोग्यदायी जीवनशैली जगू शकत नाहीत.

उशिरा जेवल्याचा परिणाम म्हणजे अनेक आजार. पूर्वीचा काळ वेगळा होता, आजच्या इतक्या सोयीसुविधा नव्हत्या, तंत्रज्ञान नव्हते,  हे जरी मान्य केले तरीही त्यांची दिनचर्या नक्‍कीच आरोग्यदायी होती. 

सकाळी लवकर उठणे आणि रात्री उशिरा झोपणे हा त्या दिनचर्येचा गाभा होता. त्यांच्या जेवणवेळाही नियमित असायच्या. त्यामुळेच ते आरोग्यदायी जीवन दीर्घकाळ जगू शकले. पण, हल्ली लोक रात्री उशिरा जेवतात. त्यामुळे झोपण्याची वेळ आणि आरोग्य दोन्हीवर परिणाम होतो. आपल्यापैकी कोणालाही उशिरा जेवण्याची सवय असेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊ या! 

तंदुरुस्त आहारासाठी योग्य वेळी झोपणे, सकाळी योग्य वेळी उठणे तसेच योग्य वेळी जेवण करण्याबाबत आयुर्वेदानेही सांगितले आहे. रात्री उशिरा जेवण करण्याचे दुष्परिणाम काय, ते पाहू या! 

1. वजन वाढणे : रात्री खूप उशिरा जेवण केल्यास ते पचवणे अवघड होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाचा आजार होण्याचा धोका असतो. त्या शिवाय स्थूलता वाढण्याचे एक महत्त्वाचे कारणही रात्री उशिरा जेवणे. 

2. तणाव : रात्री जेवण उशिरा केले की झोपेतही अडथळा येतो. त्यामुळे सकाळी संपूर्ण दिवस थकवा आल्यासारखे वाटते आणि तणाव निर्माण होतो. तणावमुक्‍त आयुष्य हवे असल्यास रात्री लवकर जेवावे. 

3. उच्च रक्‍तदाब : जेवणानंतर कोणतेही काम न केल्यास शरीर अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे उच्च रक्‍तदाबाचा त्रास होतो. 

4. मधुमेह : जेवल्यानंतर लोकांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. त्यामुळे रक्‍तातील शर्करेचे प्रमाण वाढते. कालांतराने ही सवय त्रासदायक ठरू शकते. रात्री लवकर जेवावे आणि जेवल्यावर शतपावली जरूर करावी. 

5 अपचन : ज्या व्यक्‍तींना अपचनाचा त्रास होतो, त्यांनी उशिरा जेऊ नये. त्यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक भेडसावतात. 

6 चिडचिड : पुरेशा प्रमाणात शांत झोप न लागल्यास त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होताना दिसतो. मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही आणि परिणामी चिडचिड होते. 

7 झोप न येणे : रात्री उशिरा जेवल्यावर घशाशी येण्याचा त्रास होतो. त्यामुळे जीव घाबरा होतो आणि झोपही येत नाही.