Tue, Sep 22, 2020 10:00होमपेज › Select Category › पालघर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ७ हजारांवर

पालघर जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ७ हजारांवर

Last Updated: Jul 05 2020 9:05PM

संग्रहित छायाचित्रपालघर : पुढारी वृत्तसेवा

वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ७ हजार २७४ वर पोहोचली आहे. ५ हजार ७२९ रुग्ण वसई विरार महापालिका, तर १ हजार ३४५ रुग्ण संख्या पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. गेल्या २४ तासात २७७ नवे रुग्ण दाखल झाले असून २२४ वसई, तर १८ रुग्ण पालघरच्या ग्रामीण भागातील आहेत. दिवसभरात ३४३ रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. गेल्या चोवीस तासात वसईतील दोघांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा १४४ झाला आहे.

अधिक वाचा :  अमेरिकेला जाण्याचा किंवा येण्याचा बेत आहे का? बातमी आपल्यासाठी!

पालघर जिल्ह्यात वसई विरार महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून ही संख्या आता ५ हजारह ९२९ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुक्‍त झालेले २ हजार ६६८ असून ३ हजार १३५ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसेंदिवस नवीन रुग्ण संक्रमित होत असताना तेवढेच रुग्ण कोरोनामुक्‍तही होताना पाहायला मिळत आहे. पालघरच्या ग्रामीण भागातील १ हजार ३४५ रुग्णसंख्या असून आतापर्यंत ७६१ कोरोनामुक्‍त तर ५६६ जण उपचार घेत आहेत. मृत्यूदर मोठ्या प्रमाणात नसला तरी रुग्ण रिकव्हर होण्यासाठी बराच कालावधी लागत असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा : केवळ बायकोसाठी बनवली हटके गाडी; पाहणाऱ्यांनी सुद्धा केला ग्रँड सॅल्युट!

४१ हजार ०३९ कोव्हिड १९ ची चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या असून १ हजार ७१२ जणांचे अहवाल अद्याप प्राप्‍त झालेले नाहीत. दमम्यान पालघर - ३६, डहाणू ९, विक्रमगड १ आणि वाडा ७ असे ५३ रुग्ण आढळले. तलासरी, जव्हार, मोखाडा, वसई ग्रामीण या तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या आढळली नसल्यामुळे या तालुक्यातील रहिवाशांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. सद्यस्थितीत १७५ क्षेत्रे प्रतिबंधित केली असून एकूण पालघर ग्रामीणमधील रुग्णसंख्या १३४५ झाली आहे.

 "