Tue, Jun 15, 2021 12:56
मिरजेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Last Updated: Jun 11 2021 1:04AM

मिरज : पुढारी वृत्तसेवा

मिरजेत अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून आणि गुंगीचे औषध देऊन एका चिकन विक्रेत्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने मिरज शहर पोलिस ठाण्यात फैय्याज मेहबूब कोकणे (वय 25, रा. बोकड चौक, मिरज) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कोकणे याला अटक केली आहे.

कोकणे याचे मिरजेत बोकड चौकात चिकन सेंटर आहे. दुकानात चिकन नेण्यासाठी येणार्‍या 12 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीशी कोकणे याची ओळख झाली. दि. 22 मार्च रोजी मुलगी घरात एकटीच असताना कोकणे तिच्या घरी गेला. त्याने मुलीस घरातून बाहेर बोलावून नेले. त्यांतर त्याने तिला गुंगीच्या औषधाची गोळी खायला दिली. त्यानंतर पुन्हा तिला घरात नेले.  तिला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखविले. ती विरोध करीत असताना  त्याने तिच्यावर बलात्कार केला. कोकणे याने वारंवार असा प्रकार सुरू केल्यानंतर  मुलीने आईला याची माहिती दिली. आईने मिरज शहर पोलिसात  कोकणे याच्याविरुध्द फिर्याद दिली. पोलिसांनी कोकणे याच्याविरुद्ध  बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.