होमपेज › Satara › कराड :  गणेश विसर्जनासाठी गेलेला युवक बुडाला

गणेश विसर्जनासाठी गेलेला युवक बुडाला

Published On: Sep 12 2019 12:17PM | Last Updated: Sep 12 2019 12:17PM

संग्रहित छायाचित्रकराड :  प्रतिनिधी 

आगाशिवनगर (मलकापूर, ता. कराड) येथे गणपती विसर्जनासाठी गेलेला २२ वर्षीय युवक कोयना नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी घडली. या घटनेमुळे माळीनगर परिसरातील शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आगाशिवनगर येथील शिंदे कुटुंबातील २२ वर्षीय युवक घरगुती गणपती विसर्जनासाठी कोयना नदीपात्रात गेला होता. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मलकापूर नगरपरिषदेच्या जॅकवेल परिसरात ते सर्वजण गणपती विसर्जन करत होते. त्यावेळी हा युवक गटांगळ्या खाऊ लागला. तो बुडत असल्याचे इतरांच्या लक्षात आल्यावर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र तो युवक बुडाला. हा प्रकार समजल्यावर घटनास्थळी गर्दी जमली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव गायकवाड, हवालदार सुनील पन्हाळे यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बुडालेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू झाले. महाबळेश्वरची पोहण्यात पटाईत असलेली टीम कोयना नदीपात्रात शोध घेण्याचा अथक प्रयत्न करत होती. कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने होता. त्यामुळे शोध घेण्यात अडथळा येत होता.