Sat, Dec 07, 2019 09:00



होमपेज › Satara › लिंबखिंडजवळील अपघातात महिला जागीच ठार

लिंबखिंडजवळील अपघातात महिला जागीच ठार

Published On: May 21 2018 4:53PM | Last Updated: May 21 2018 4:53PM



सातारा : प्रतिनिधी

लिंबखिंड ता. सातारा येथे रविवारी रात्री दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. उज्वला भरत पवार (वय 53, मूळ रा.महिगाव ता.जावली सध्या रा.जरंडेश्वर नाका, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. रस्त्यावर मृत कुत्र्यावरून दुचाकी घसरल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये भरत पवार किरकोळ जखमी झाले.

याबाबत अधिक माहिती अशी, पवार दाम्पत्य रविवारी नातलगाचा बारशाचा कार्यक्रम असल्याने दुचाकीवरुन महिगाव येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते साताराकडे येत होते. लिंबखिंड येथे आल्यानंतर महामार्गावरुन न जाता जुन्या रस्त्यावरुन ते सातरकडे येत होते. विठ्ठल-मंगलम मंगलकार्यालय परिसरात आल्यानंतर रस्त्यामध्ये एक मृत कुत्रे पडलेले होते. 

रस्त्यावरील त्या मृत कुत्र्यावरुन दुचाकी गेल्यानंतर पाठीमागे बसलेल्या सौ. उज्वला पवार या रस्त्यावर पडल्या व डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. मृत उज्वला पवार या सातारा येथील गुजराती अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत शाखाधिकारी पदावर कामाला होत्या.