Sat, Nov 28, 2020 16:09होमपेज › Satara › 'उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशाचा सातारा जिल्हा भाजपला फायदा'

'उदयनराजे भोसले यांच्या प्रवेशाचा सातारा जिल्हा भाजपला फायदा'

Published On: Sep 17 2019 10:16AM | Last Updated: Sep 17 2019 10:58AM

शेखर चरेगावकर 'दैनिक पुढारी'शी बोलताना कराड : प्रतिनिधी 

छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यातील भाजप अधिक मजबूत झाली आहे. जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघात याचे चांगले परिणाम दिसणार असून सर्व आठ जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केला. 

विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर पक्षांतराचे वारे महाराष्‍ट्रात जोरात वाहत आहे. नुकताच उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपत प्रवेश केला आहे.  सातारा जिल्‍ह्‍यात देखील वातावरण भाजपमय झाले आहे. याच पार्‍श्वभूमिवर शेखर चरेगावकर यांनी  मत मांडले.