Thu, Sep 24, 2020 11:36होमपेज › Satara › साताऱ्यात अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड

साताऱ्यात अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड

Last Updated: Jan 19 2020 4:17PM
सातारा : प्रतिनिधी

शनिवारी मध्यरात्री मंगळवार पेठेत अज्ञातांनी चारचाकी वाहनांना लक्ष्य करत दगड घालून त्यांची तोडफोड केली. ही घटना रविवारी सकाळी समोर आल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अधिक वाचा : कपिल सिब्बल यांनी 'त्या' वक्तव्यावरून एक दिवसात मारली पलटी!

याबाबत प्राथमिक माहिती अशी, मंगळवार पेठेतील काशी विश्वेश्वरय्या मंदिराच्या वरील बाजूस शनिवारी रात्री दोन कार पार्कींग केलेल्या होत्या. मध्यरात्री काही हुल्लडबाजांनी त्या कारवरील काचांना लक्ष्य करून त्याची तोडफोड केली. रविवारी सकाळी ज्येष्ठ नागरिक फिरायला जात असताना त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 "