होमपेज › Satara › उदयनराजेंचा भाजप प्रवेश दिल्लीत 

उदयनराजेंचा भाजप प्रवेश दिल्लीत 

Published On: Aug 30 2019 1:42AM | Last Updated: Aug 30 2019 1:42AM

उदयनराजे भोसलेसातारा : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेपासून दूर राहिलेले खा. उदयनराजे भोसले यांच्या भाजप  शिक्कामोर्तब झाले असून दिल्लीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. दि. 3 सप्टेंबर की 5 सप्टेंबर रोजी प्रवेश करायचा, याचा निर्णय गुरुवारी रात्री उशिरा होणार आहे. 

उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दहा वर्षे  राहिले. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येऊन त्यांनी हॅट्ट्रिकही साधली. राष्ट्रवादीत असताना त्यांचे व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कधीच पटले नाही. केवळ शरद पवार यांच्या प्रेमापोटी ते राष्ट्रवादीत राहिले. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशाचे व राज्याचे चित्र बदललेले दिसल्यानंतर उदयनराजेंनाही नवी राजकीय दिशा खुणावू लागली. मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची व उदयनराजेंची  मैत्री आहे.

लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी उदयनराजे पक्षात येतील, म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रेमापोटी ‘छप्पर फाड के’ निधी सातार्‍याला दिला. लोकसभेला उदयनराजेंनी राष्ट्रवादीतच   थांबण्याचा निर्णय घेऊनही सातार्‍याच्या सभेला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंवर चकार शब्द न काढता आपले मित्रप्रेम सिद्ध केले. उदयनराजेंनाही आता याच मित्रप्रेमाची आठवण होत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्याच्या निमित्ताने त्यांनी  भेट घेतली व भाजपमध्ये  प्रवेश करण्यासंदर्भात त्यांची व मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. उदयनराजेंनी प्रवेश केल्यास त्यांना लोकसभेचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यासंदर्भाने निवडणूक आयोगाशी चर्चाही झाल्याचे वृत्त आहे. सर्व बाबींची खातरजमा झाल्यानंतर गुरुवारी दिल्ली येथून उदयनराजेंना राजीनामा देण्याचा निरोप आला.

दिवसभरात तारखेवर खल सुरू होता. उदयनराजेंना  प्रवेश करायचा आहे.  त्यामुळे 3 की 5 सप्टेंबर, यावर रात्री उशिरा निर्णय होणार आहे. ज्या दिवशी प्रवेश त्याच दिवशी  दिल्ली येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व लोकसभेचा ते राजीनामा देणार आहेत. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर  आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे सातारा जिल्ह्याची राजकीय समीकरणे आणखी बदलणार आहेत. शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशामुळे आधीच खिळखिळी झालेली राष्ट्रवादी  काँग्रेस उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे आणखी खिळखिळी होणार आहे.