Fri, Apr 23, 2021 14:57
सातारा : खंबाटकी घाटात अग्नितांडव, वणव्यात ट्रक आणि कार जळून खाक

Last Updated: Apr 07 2021 3:00PM

खंडाळा (सातारा) : पुढारी वृत्तसेवा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात बुधवारी आज (दि.०७) दुपारी वणवा पेटला. यात घटनेत एक ट्रक व कार पेटली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महामार्गावरील या अग्नितांडवाने खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वणवा विझवण्याबरोबरच घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे.

अधिक वाचा : आई कुठे काय करते फेम ईशा- विमलचा रॉयल लूक (video)

बुधवारी दुपारी दीड वाजता घाटातून धुराचे लोट दिसू लागले. दरम्यान, काही क्षणातच आगीचे व धुराचे प्रमाण वाढल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीमुळे वाहन चालकांची भंबेरी उडाल्याने वाहनांची कोंडी झाली आहे.