Tue, Jul 14, 2020 03:23होमपेज › Satara › पोलिसाला मारहाणप्रकरणी तिघांना अटक

पोलिसाला मारहाणप्रकरणी तिघांना अटक

Published On: Jan 09 2018 1:36AM | Last Updated: Jan 08 2018 10:12PM

बुकमार्क करा
ओझर्डे : वार्ताहर 

पुणे-सातारा महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत रात्र गस्त घालणार्‍या भुईंज पोलिसाला दारूच्या नशेत टेम्पो चालकांनी मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

भुईंज पोलिस ठाण्याचे हवालदार विजय बाळकृष्ण जाधव त्यांच्या वाहनचालकासह रात्री 9 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना तीन लेनवरून तीन आयशर टेम्पो एकाचवेळी शर्यत लावल्यासारखे धावत होते. पाठीमागून येणार्‍या वाहनांना ते रस्ता देत नव्हते. हे जाधव यांच्या लक्षात आल्याने  त्यांनी संबंधित वाहनांना थांबवून हा वाहन चालविण्याचा कोणता प्रकार आहे? अशी विचारणा केली. दारूच्या नशेत असणार्‍या टेम्पो चालकांनी पोलिस जाधव  यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर पोलिसांनी वेळे ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी सोमनाथ भगवान डोरे, रा.मळवडी (वय 24 वर्षे ता. मावळ), आकाश नंदू चौपडे (वय 23 रा.नायगाव ता. मावळ),  विठ्ठल विजय गराडे (वय 33 रा. बहुरवाडी ता. मावळ), अनिल चंद्रकांत ढोरे (वय 31 रा. मळवडी ता. मावळ) यांना अटक केली. सरकारी कामात अडथळा व दारू पिवून वाहन चालवण्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद हवालदार विजय जाधव यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दिली.