Mon, Jul 13, 2020 08:01होमपेज › Satara › 'शिवजयंती जनजागृती रॅली'ने साताऱ्यात भगवे वादळ

'शिवजयंती जनजागृती रॅली'ने साताऱ्यात भगवे वादळ

Published On: Feb 17 2018 9:26PM | Last Updated: Feb 17 2018 9:29PMसातारा : प्रतिनिधी

‘एक सातारा, एक शिवजयंती’चा नारा देत शिवजयंती महोत्सव राजधानी सातारातर्फे आयोजित केलेल्या बाईक रॅलीला सातार्‍यातील शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवजयंती जनजागृतीच्या अनुषगांने सातारा शहरातून काढण्यात आलेल्या या रॅलीने राजपथावर भगवे वादळच अवतरले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राजधानी सातार्‍यात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या जनजागृती रॅलीसाठी शाहू स्टेडीयमवर दुपारपासून शिवप्रेमींनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे या रॅलीत महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. शाहू स्टेडियमवर भगवा फेटा, भगवे झेंडे घेऊन आलेल्या तरुणाईमुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले.

शाहू स्टेडियमवर सर्व एकत्र जमल्यानंतर शिवश्‍लोक म्हणण्यात आला. त्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणा देत शिवप्रेमींची बाईक रॅली पोवई नाक्यावर मार्गस्थ झाली. पोवई नाक्यावर पोहल्यानंतर शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बाईक रॅली राजपथ, राजवाडा, सम्राट चौक, पोवई नाका आणि पुन्हा शाहू स्टेडीयमवर पोहचली.  यावेळी जनजागृती रॅलीनिमित्त कोठेही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शहरातील वाहतुकीची शिस्त मोडू नये, यासाठी सातारा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.