Fri, Jul 03, 2020 03:36होमपेज › Satara › सातारा : शिरवळच्या फौजदाराला कोरोना

सातारा : शिरवळच्या फौजदाराला कोरोना

Last Updated: Jun 02 2020 11:43AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा पोलिस दलाअंतर्गत येणाऱ्या शिरवळ पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असलेल्या फौजदाराला कोरोनाची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ते सातारा-पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरील चेकपोस्टवर बहुतांशी वेळ कर्तव्य बजावत होते. त्यातूनच त्यांना लागण झाली असल्याची शक्यचा वर्तवली जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिरवळ पोलिस ठाण्यात व पोलिस दलात खळबळ उडाली आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी, संबंधित फौजदार मूळचे पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यांची शिरवळ पोलिस ठाण्यात पहिलीच पोस्टिंग आहे. सध्या ते पत्नी सोबत शिरवळमध्ये वास्तव्य करत आहेत. शिरवळ चेक पोस्टवर त्यांची नेहमी ड्यूटी असते. कोरोनामुळे चेक पोस्टवर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तपासणी होत आहे. यामुळे ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्या सोबत पोलिसांचा संबंध येतो. 

रविवारी शिरवळ चेकपोस्ट वरील पोलिसांचे स्वॅप घेण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा त्याचे रिपोर्ट आले. त्यातील केवळ फौजदाराचा रिपोर्ट पोझीटिव्ह आला. उर्वरितांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. फौजदाराला रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. फौजदाराला उपचारासाठी रुग्णालयात पाठवून शिरवळ पोलिस ठाण्यातील काही पोलिसांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.