सातारा : मेढ्याच्या नगरसेविकेची पुण्यात आत्महत्या

Last Updated: Nov 28 2020 2:11AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

मेढा येथील प्रसिद्ध डॉ. रमेश कदम यांच्या पत्नी नगरसेविका डॉ. प्राची कदम यांनी पुणे येथे आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यामुळे मेढ्यात खळबळ उडाली आहे. 

डॉ. प्राची कदम या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्या पती रमेश यांच्यासह मेढा येथे खाजगी हॉस्पिटल चालवतात. दोन वर्षापूर्वी त्यांना भाजपने मेढा नगर पंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली होती. गेल्या तीन महिन्यांपासून त्या पुणे येथे माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकले नाही. याबाबत पुणे येथे कोणतीही तक्रार किंवा नोंद पोलिसांमध्ये झालेली नाही.