Sun, Jul 12, 2020 17:56होमपेज › Satara › साताऱ्यात शक्ती प्रदर्शन न करता विधानसभेसाठी भाजपच्या मुलाखती

साताऱ्यात शक्ती प्रदर्शन न करता विधानसभेसाठी भाजपच्या मुलाखती

Published On: Aug 30 2019 1:29PM | Last Updated: Aug 30 2019 2:13PM
सातारा : प्रतिनिधी

भाजपकडून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती काल (दि.२९) रात्री उशिरा घेण्यात आल्या. यावेळी सर्वच मतदावर संघातील इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आ. सोले यांनी सर्व मतदार संघातील संघटन पातळीवरील आढावा घेतला.

पदवीधर मतदारसंघाचे आ. अनिल सोले, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुलाखती घेतल्या. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, दीपक पवार, मदन भोसले, अतुल भोसले अनिल देसाई, कविता कचरे, महेश शिंदे, ऍड भारत पाटील, मनोज घोरपडे, मिलिंद काकडे, राजेंद्र काकडे, अविनाश फरांदे, स्वप्नाली शिंदे यांच्या मुलाखती दुपारी 12.30 पर्यंत झाल्या होत्या.

मुलाखती सुरू होण्यापूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची मीटिंग झाली. सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरू होत्या.