Thu, Jul 02, 2020 18:35होमपेज › Satara › सातारा कारागृहातील आणखी एका बंदिवानाला कोरोना

सातारा कारागृहातील आणखी एका बंदिवानाला कोरोना

Last Updated: May 15 2020 11:37AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा कारागृहातील २६ वर्षीय रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता एकट्या सातारा तुरुंगातील कोरोना बाधितांची संख्या १० झाली आहे. सातारा शहराच्या मध्यभागी तुरूंग आहे. पहिल्या टप्प्यात ४ त्यानंतर ५ व आता तिसऱ्या टप्प्यात आणखी एका बंदिवानाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वाचा - पाच परिचारिका कोरोनामुक्‍त

दरम्यान, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ९९, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील २ व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील १४ असे एकूण ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. याशिवाय दि. १४ मे रोजी रात्री उशिरा क्रातीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे ८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपाणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

वाचा - वाई गोळीबारप्रकरणी पाच अटक

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तींची संख्या- १२५ झाली असून यापैकी उपचार घेत असलेले बाधित रुग्ण - ७८, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- ४५, कोरोना बाधित मृत्यू झालेले २ रुग्ण आहेत.