पुणे : पुढारी ऑनलाईन
मुंबई उच्च न्यायालयाकडून डॉल्बीला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर राज्यभरातील गणेश विसर्जन मिरवणुका पारंपरिक वाद्यानेच पार पडणार आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये पोलिसांनी डॉल्बीविरोधात धडक कारवाई करताना डहाणुकर कॉलनी जवळ एक मंडळाचा मिक्सर जप्त केला.
वाचा : परिक्षेत्रात डीजे वाजणार नाही
वाचा : मुंबई उच्च न्यायालयाकडून डीजेवरील बंदी कायम
पोलिसांनी जप्तीची कारवाई करत पोलिसांनी गणेश मंडळाना कडक संकेत दिले आहेत. दरम्यान कोल्हापुरमध्ये सुद्धा शाहुपुरी पोलिसांनी डीजेविरोधात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. डीजे सेट जोडणीसाठी घेऊन जात असलेल्या ४ बेस आणि ४ टॉप पोलिसांनी जप्त केले आहे.
वाचा : डीजेला परवानगी नाहीच!
साताऱ्यात काय होणार ?
खा. उदयनराजे भोसले यांनी डीजे लावणारच अशी थेट भूमिका घेतल्याने साताऱ्यात आज काय होणार याची चर्चा चांगलीच रंगली आहे. डीजेवरून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील आणि खा. उदयनराजे आमने-सामने आले आहेत. डीजे नाही म्हणजे नाहीच अशी भूमिका पाटील यांनी मांडली आहे, तर डीजे लावणारच अशी थेट भूमिका खा. उदयनराजे यांनी घेतली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या गणेश मिरवणुकीत डीजे वाजणार की बंदच राहणार हे अनिश्चित आहे.
वाचा : सातार्यात डॉल्बी वाजणारच; खासदार उदयनराजेंचे चॅलेंज video