Sat, Oct 24, 2020 23:32होमपेज › Satara › डॉ. दाभोलकरांना सुरक्षा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

डॉ. दाभोलकरांना सुरक्षा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

Last Updated: Sep 22 2020 10:36AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचारी दादा कांबळे हे कार व दुचाकीच्या झालेल्या अपघातात ठार झाले. हा अपघात सातारा शहरालगत असणाऱ्या महामार्गावरील नागेवडी येथे झाला आहे. दरम्यान, डॉ. हमीद दाभोलकर यांना ते बॉडी गार्ड म्हणून कार्यरत होते.

वाचा : सातारा जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक ४० मृत्यू

याबाबत प्राथमिक माहिती अशी, पोलिस दादा कांबळे यांची मूळ नियुक्ती पोलिस मुख्यालयात आहे. मुख्यालय अंतर्गत बॉडी गार्ड म्हणून ते डॉ. दाभोलकर यांच्याकडे सेवा बजावत आहेत. मुळचे ते वाई तालुक्यातील आहेत. नेहमीप्रमाने ते दुचाकीवरून जात होते. यावेळी कारची धडक बसली व त्यात ते गंभीर जखमी झाले. हा अपघात रात्री झाला असून त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिस पुढील तपास करत आहेत.

वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं कोरोनाने निधन 

 "