Sat, Jul 11, 2020 19:18होमपेज › Satara › तरुणीच्या माहितीने दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश

तरुणीच्या माहितीने दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश

Published On: Jul 25 2019 1:23PM | Last Updated: Jul 25 2019 2:18PM

दुचाकी चोरणारी टोळीसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तब्बल 9 दुचाकी चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. यातील दोघांना अटक करण्यात आली. एक अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सातार्‍यातील सायली त्रिंबके या युवतीमुळे चोरट्यांची माहिती (क्लू) मिळाल्याने टोळी गजाआड झाली. यामुळे युवतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विकास मुरलीधर मुळ (वय 19, रा.पावर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा), बाळा उर्फ सुरज किसन सकटे (वय 22, रा.सातारा रोड ता.कोरेगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.याबाबत पो.नि मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेली अधिक माहिती अशी, सातार्‍यातील सायली त्रिंबके या युवतीने पोलिसांना संशयितांची माहिती दिली होती. पोलिस संशयितांचा शोध घेत असताना ते राजवाडा येथे दुचाकीवर आढळले.

पोलिसांनी थांबण्यासाठी सांगितल्यानंतर ते दुचाकीवरुन पळून जावू लागले. पोलिसांनी संशयितांचा थरारक पाठलग करुन पकडले. तिघांना दुचाकीबाबत विचारले असता, ते निरूत्‍तर झाले. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातून तब्बल 9 दुचाकी चोरल्‍याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेतली आहेत. आम्‍हाला दुचाकी चालवण्याची हौस असल्याने त्या चोरल्याची कबुली या दोघांनी दिली.

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख, पो. नि मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि विठ्ठल शेलार, पोलिस हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, मोहन वाघमळे, अमर काशीद, मिना गाढवे यांनी कारवाईत सहभाग घेतला.