होमपेज › Satara › फलटणमध्ये ट्रकचा अपघात : चालक जखमी

फलटणमध्ये ट्रकचा अपघात : चालक जखमी

Published On: Dec 03 2017 1:13PM | Last Updated: Dec 03 2017 1:11PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

फलटण-पुणे रस्त्यावर रविवारी  पहाटे  स्मशानभूमी लगत असणाऱ्या वळणावर ट्रकचा अपघात झाला. ट्रक (एमएच १२ इएफ १६९२) शिरवळहून मंगळवेढाकडे खत घेऊन निघाला होता. यावेळी फलटण दिशेकडून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागून आलेल्या ट्रॅव्हल्सने अचानक ओव्हरटेक केल्यामुळे ट्रक चालकास गाडी वळणावर घ्यावी लागली. त्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे वळणावर असणाऱ्या खड्यात हा ट्रक कोसळला. अपघातात  ट्रकचे मालक आनंद दत्तात्रय मेटकरी, ( वय-23 ) किरकोळ जखमी झाले.