होमपेज › Satara › रुग्णसेवेचे तीनतेरा; रुग्णाचे डबल ऑपरेशन (Video)

रुग्णसेवेचे तीनतेरा; रुग्णाचे डबल ऑपरेशन (Video)

Published On: Sep 11 2019 12:05PM | Last Updated: Sep 11 2019 12:05PM

डबल ऑपरेशन झालेला रूग्णसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाचे (सिव्हील) लाचखोरीचे प्रकरण ताजे असतानाच रुग्णसेवेचेही तीनतेरा वाजल्याचे समोर आले आहे. अजित पवार नामक जावली तालुक्यातील रुग्णावर हर्नियाचे ऑपरेशन सिव्हीलमध्ये झाल्यानंतर दहा दिवस अ‍ॅडमिट करुन ठेवले. मात्र त्रास कमी न झाल्याने अखेर ते खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांचे पुन्हा तेथे ऑपरेशन करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सिव्हीलमध्ये बसवलेली जाळी दुसर्‍या ऑपरेशनमध्ये बदलण्यात आली. दरम्यान, या सर्व प्रकारामुळे सिव्हीलबाबत संताप व्यक्त केला जात आहे.