Wed, Jul 08, 2020 15:48होमपेज › Satara › ..तर उदयनराजेंना आम्ही निवडून आणू : आठवले

..तर उदयनराजेंना आम्ही निवडून आणू : आठवले

Published On: Mar 10 2018 4:01PM | Last Updated: Mar 10 2018 4:01PMसातारा : प्रतिनिधी 

खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेसाठी जागा दिली नाही तर त्यांना रिपाईचे तिकीट देवून निवडून आणण्याची जबाबदारी घेवू. असे वक्तव्य रामदास आठवले यांनी सातारा येथे केले.

आठवले म्हणाले ‘उदयनराजे आले तर त्यांचे पक्षात स्वागतच आहे. उदयनराजे सक्षम नेते आहेत. तसेच ते माझे चांगले मित्र आहेत.’ मराठा नेता म्हणून रिपाईंमध्ये आले तर पक्षाची ताकद वाढेलच असा विश्‍वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

याचबरोबर आठवले यांनी नारायण राणेंनी रिपाईमध्ये यायला काय हरकत नाही. असेही वक्तव्य केले. हे दोन्ही नेते जर रिपाईमध्ये आले तर राज्याच्या राजकारणात रिपाईचा दबदबा वाढेल असेही रामदास आठवले म्हणाले.