Wed, Aug 12, 2020 12:58होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात 6 मृत्यू; 202 बाधित

सातारा जिल्ह्यात 6 मृत्यू; 202 बाधित

Last Updated: Aug 02 2020 1:35AM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जलदगतीने वाढण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिकांमध्ये समूह संसर्ग वाढल्याने शुक्रवारी रात्री उच्चांकी बाधित आढळले होते. मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह येऊ लागल्याने मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढली आहे. शनिवारी उपचारादरम्यान सहा बाधितांचा मृत्यू झाला. शनिवारी 202 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4 हजार 252 झाली आहे. याचबरोबर दिवसभरात 42 जण कोरोनामुक्‍त झाले; तर 559 संशयित नव्याने दाखल झाले आहेत. 

जुलै महिना सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात बाधितांचा स्फोट होऊ लागला आहे. यापूर्वी 70 ते 80 च्या घरात सापडणारे बाधित आता 200 च्या पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहेे. लॉकडाऊन असतानाही मोठया संख्येने बाधित सापडू लागल्याने प्रशासनाचीही डोकेदुखी आता वाढली आहे.

शनिवारी उपचारादरम्यान जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल असलेला येवती (ता. कराड) येथील 75 वर्षीय पुरुष, झिरपवाडी (ता. फलटण) येथील 80 वर्षीय पुरुष या दोघांचा तर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला सातार्‍यातील गुरुवार पेठेतील 25 वर्षीय युवक व वाईतील परखंदी येथील 81 वर्षीय महिला, सोनगिरवाडीतील 35 वर्षीय व्यक्‍ती व गोडोली (ता. सातारा) येथील 64 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे आता कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 136 झाली आहे. 

शनिवारी खासगी प्रयोगशाळेतील 33 जण बाधित आले. यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ 21, खंडाळा 2, सातार्‍यातील व्यंकटपुरा 1, निगडी 1, ग्रीन सिटी 1, भुविकास बँक 1, अंगापूर 1, त्रिमूर्ती मंगल कार्यालय 1, कारी 1, देगाव 3 यांचा समावेश आहे. 

शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये वाई तालुक्यातील वाई शहर 19, खानापूर 1, शहाबाग 2, जांब 1, सह्याद्रीनगर 1, बावधन 1, कवठे 6, परखंदी 1 असे 32 पॉझिटिव्ह आढळले आहेत. कराड तालुक्यातील कराड शहर 8, येवती 3, शामगाव 2, कोयना वसाहत 2, सजूर 1, वडगाव 1, मुंढे 1, शेरे 2, कार्वे नाका 1, उंब्रज 1, आगाशिवनगर 1, म्हासोली 1, कालवडे 2, सह्याद्री हॉस्पिटल 2, श्रद्धा क्‍लिनिक 4, सैदापूर 1 अशा 33 जणांना लागण झाली आहे. खंडाळा तालुक्यातील पळशी 1, विंग 3, शिरवळ 24, लोणंद 4, अहिरे 1, खंडाळा 1, धनगरवाडी 1, मोर्वे 1 असे 36 जण बाधित सापडले आहेत. 

सातारा तालुक्यातील रामकृष्णनगर 10, कण्हेर 9, शेंद्रे 1,  कुस 3, गोडोली 3, संभाजीनगर 8, कामाठीपुरा 1 अशा 35 जणांना कोरोनाची बाधा झली आहे. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, कुमठे 7, वाघोली 1 असे 9 बाधित आले आहेत. खटाव तालुक्यातील  थोरवेवाडी 1, चितळी 1, उंबर्डे 1 अशा तिघांना लागण झाली आहे. फलटण तालुक्यातील शहरातील मलटण 3, जिंती नाका 6, स्वामी विवेकानंदनगर 1, सोमवार पेठ 1, रामबाग कॉलनी 4, मुंजवडी 2 असे 17 जण बाधित आले आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यातील गोडवली 7, बेल एअर हॉस्पिटल पाचगणी 1, पाचगणी 1 अशा 9 जणांना लागण झाली आहे.  जावली तालुक्यातील दुदुस्करवाडीतील 22 जण पॉझिटिव्ह आले आहेत. पाटण तालुक्यातील सणबूर 1, पाटण 2, तारळे 2, मल्हारपेठ 1, निसारी 2 अशा 8 जणांचे रिपोर्ट बाधित आले आहेत. 

जिल्ह्यातील शनिवारी 42 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत 2 हजार 84 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 136 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 1 हजार 157 जणांचे रिपोर्ट अद्यापही प्रलंबित असल्याने त्यांच्या रिपोर्टची धास्ती लागली आहे.