Wed, Apr 01, 2020 23:09होमपेज › Satara › सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी मुंबईला रवाना (video)

सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी मुंबईला रवाना (video)

Last Updated: Feb 19 2020 10:39AM

आमदार शिवेंद्रराजे भोसलेसातारा : पुढारी वृत्तसेवा

जावलीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची प्रकृती काल रात्री अचानक बिघडली. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने प्रतिभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्यांची प्रकृती स्थिर झाली. सकाळी प्रकृतीच्या संदर्भाने आणखी चाचण्या करण्यासाठी ते स्वतः मुंबईला गेले.

वाचा : एसआयटी चौकशीच्या मागणीची खबर दिल्लीला गेलीच कशी?

मात्र, रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याच्या बातमीने अख्खा सातारा हादरून गेला होता. प्रतिभा हॉस्पिटलमध्ये कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे ही रात्री उशिरा पुण्याहून त्यांना भेटायला आले. शिवेंद्रराजे यांच्या प्रकृतीच्या बातमीने ते अस्वस्थ होते. शिवेंद्रराजे यांना पाहिल्यानंतर मात्र त्यांना हायसे वाटले. दोघे ही दिलखुलास बोलले. उदयनराजे यांनी डॉक्टरांशी चर्चा केली. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. त्यानंतर उदयनराजे निघून गेले.

संभाव्य धोका नको म्हणून अधिक चाचण्या करण्यासाठी सकाळी ते स्वतः मुंबईला गेले. मी सुखरूप असून कुणीही चिंता करू नये, असे आवाहन शिवेंद्रराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

वाचा : २६/११ चा हल्ला ‘हिंदू दहशतवाद’ ठरवण्याचा तोयबाचा कट होता!